खताचा खांब

स्वैपाकघरातला दैनंदिन ओला कचरा बाकीच्या कचर्‍यापासून बाजूला ठेवावा, त्याचे खत करावे, अशी बरीच दिवस इच्छा होती. पण नेमके कसे सुरू करावे हे कळत नव्हते. जो तो मला इथल्या दमट हवेमुळे कचर्‍याभवती डास-चिलटं आणि वासाच्या त्रासाबद्दल भीती घातल होता. फार किचकट नसणारा साधा डबा बाल्कनीच्या एका कोपर्‍यात मला ठेवायचा होता. कचर्‍याला हवा लागली पाहिजे पण चिलटं लागायला नकोत, खत जमा व्हायला आणि ओलसर कचरा गळायाला खाली चांगली जागा पाहिजे, अशा सगळ्या अडचणी होत्या. पण आमच्या घराजवळच कचर्‍याचा ढीग जमतो, आणि प्लास्टिकच्या पिशवींमध्ये सगळ्यांनी मिसळून टाकलेला ओला-सुका कचरा संध्याकाळ पर्यंत कावळ्यांमुळे रस्ता भर पसरतो. बघवत नाही. त्यामुळे आपल्यापुरतं तरी काहीतरी केलंच पाहिजे असा निर्धार केला.

बंगलोर-स्थित “डेली डंप” या संस्थेकडून छोट्याशा बाल्कनीत खताची व्यवस्था कशी करता येईल या बद्दल चांगली माहिती मिळाली. ते या साठी सुंदर मातीचे घडे देखील विकतात. पण कलकत्त्याला ती पाठवणं त्यांना शक्य आणि परवडण्यासारखं नव्हतं. मी त्यांना फोन केल्यावर “तिथल्याच एका कुंभाराशी बोलून असेच काहीतरी करून घ्या” असा सल्ला त्यांनी मला दिला. त्यांनी द्यायला आणि मला ते अंमलात आणायला एक वर्ष लागलं, पण शेवटी जमलं, हे महत्त्वाचं. डेलीडंपवाल्यांच्याच एका मॉडेलवरून मी एकाच आकाराच्या तीन मोठी मातीच्या कुंड्या निवडल्या.

फुलांच्या नक्षीकामामुळे त्यांच्या बाजूला हवी तशी छिद्रं होतीच. माशांचा त्रास चर झालाच तर आतून मच्छरदाणीचं कापड फाडून छिद्रांवर चिकटवण्याचा बेत आहे. त्यातील दोन कुंड्यांच्या बुडाला मी कुंभाराकडून थोडे मोठे भोक कापून घेतले. मग त्यावर एक जाळी घातली. सर्वात खालची, तिसरी कुंडी तशीच, पाण्यासाठी अगदी छोटेसे भोक असलेली.

जाळीच्या दोन्ही कुंड्या या तिसर्‍या कुंडीवर रचल्या. बेत असा: पहिल्या, सर्वात वरच्या कुंडीत रोजचा कचरा टाकायचा. ती भरली, की मधली, दुसरी कुंडी वर आणून, ही भरलेली मधल्या ठिकाणी ठेवायची. दुसरी भरेपर्यंत पहिलीतला कचरा कुजून मातीसारखा झाला असावा; पुन्हा हिला वर ठेवायची वेळ आली, की ही माती-खत सर्वात खालच्या कुंडीत ओतून टाकायचे. आता पुन्हा ही कुंडी भरेपर्यंत दुसरी, वरून उतरविलेली मध्यभागी ठेवायची. असेच या दोन्ही कुंड्यांना आदलून-बदलून वर-मधे ठेवायचे, आणि खालच्या कुंडीत माती-खत साठवायचे. ती देखील भरली, की बाल्कनीतल्या इतर फुल-पालांच्या कुंड्यात घालायचे!

एक रुटीन बसायला किती दिवस लागतात बघू. पण आज पहिल्यांदा सालं-बिलं वरच्या कुंडीत टाकल्यावर खूप मजा आली. सध्या तरी दोनच झाडं आहेत – एक तुळशीचं, आणि एक कडिपत्त्याचं. मागे कोथिंबीर छान आली होती, आणि आता मिर्चीचे देखील लावायचे आहे. हा उपक्रम यशस्वी झाला तर अजून कुंड्या आणता येतील. पण कडिपत्त्याचं रोप लहान कुंडीतून मोठ्यात यशस्वी रित्या लावता आलं, याने चांगलाच हुरूप आलाय. मला फुलझाडांचं तेवढं आकर्षण नाही, पण एक मोगरा आणि गुलाब लावता आले तरी पुष्कळ होईल!

Advertisements
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

6 Responses to खताचा खांब

 1. Aditi म्हणतो आहे:

  हे तर मस्तच. पुढे काय होतंय हे ऐकायला आवडेल.

  • प्राची म्हणतो आहे:

   कचर्‍यात बायोकल्चर यिक्त माती मिसळली आहे. काही आठवड्यांनी  झाकण उघडून दिसेल त्या दृष्याचा फोटो काढून रिपोर्ट देते!

   ________________________________

 2. गौरी म्हणतो आहे:

  तुमचा खताचा खांब खूपच कलात्मक दिसतोय!

  “डेली डंप”चं डिझाईन मलाही खूप आवडलं होतं, पण मातीची कुंडी भरल्यावर बर्‍यापैकी जड होणार त्यामुळे त्याहून हलकं (आणि स्वस्तातलं) काहीतरी हवं होतं … मी रंगाचे डबे एकावर एक ठेवून हा उद्योग करून बघितलाय. 🙂

 3. गौरी म्हणतो आहे:

  प्राची, ‘डेली डंप’चं डिझाईन मस्त आहे. बाकी ज्या काही कंपोस्टिंग सिस्टिम बघितल्या त्यापेक्षा हे मला खूपच आवडलं. पण मला पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर कंपोस्टिंग करायचं होतं – किती जमेल याविषयी खात्री नव्हती. त्यासाठी मला ‘डेली डंप’चा खांब महाग वाटला. (पुण्यामध्ये त्या डिझाईनच्या कंपोस्ट बीन तयार मिळतात.) पण ते डिझाईन वापरून कुठल्याही बायोडिग्रेडेबल मटेरियलमध्ये तुम्ही स्वतः कंपोस्ट बीन बनवायला त्यांची हरकत नाही हे मला विशेष वाटलं.
  http://mokale-aakash.blogspot.com/2011/12/blog-post_26.html
  इथे मी या कंपोस्टिंगच्या उठाठेवीविषयी लिहिलंय … तुमच्या प्रयोगाची प्रगती वाचायला आवडेल 🙂

 4. remigiusdesouza म्हणतो आहे:

  खताचा खांब : विधायक सर्जनशीलतेचा एक नमुना! फार भावला! अभिनंदन!

 5. sonamaddy म्हणतो आहे:

  कल्पना खूप छान आहे.मलाही प्रयत्न करायला खूप आवडेल पण सध्या जागेअभावी करू शकत नाही.कधी तरी नक्की करून बघेन मी .. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s